हृदयविकाराचा झटका वेळीच ओळखा, प्रथोमोपचार म्हणून करा ‘या’ गोष्टी

हृदयविकार यापेक्षा हार्ट अटॅक हे नाव सर्वांच्या ओळखीचे आहे. या आजारामुळे अनेकांना आपल्या जवळच्या माणसांना कायमचे गमवावे लागले आहे. हार्ट अटॅक कुणाला कधी येईल याची काही खात्री नाही असे म्हणतात. पण हृदयविकाराचा धक्का आल्याचे वेळीच ओळखणे आणि त्यावरील उपचार करणे आवश्यक आहे.

भारतात हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. बऱ्याच लोकांना या झटक्याची लक्षणे समजत नाहीत. तसेच रुग्णालयात पोहोचेपर्यंत कोणते प्रथोमोपचार करायला हवे याची माहिती नसते. आपल्या कुटुंबासाठी आणि जवळच्या माणसांसाठी सर्वांना या आजाराची लक्षणे आणि प्रथोमोपचाराची माहिती असने आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, हृदयाची कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते तेसच रक्तपुरवठा खंडित होतो. यामुळे स्नायूंचे नुकसान होते, ते दुर्बल बनतात. याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात. हृदयविकाराचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते.

हृदयविकाराची लक्षण-
छातीत दुखणे- सौम्य वेदना किंवा ठराविक हालचाल केल्यानंतर वेदना येणं (उदा- चालणे, जिने चढणे, सायकल चालवणे, आंघोळ, जेवण करणे)
उलटी किंवा मळमळ- पित्ताचा त्रास आहे असं आपण म्हणतो पण तो हृदयाचा असू शकतो. त्यामुळे पित्त आहे म्हणून हृदयातील दुखणे आणि मळमळीकडे दुर्लक्ष करु नका.

चक्कर येणे- काही कारण नसताना अचानक क्षणभरासाठी चक्कर येणे.
छाती जड वाटणे- छातीवर दाब आल्यासारखे वाटणे तसेच वेदना जबड्यावर, मानेवर किंवा डाव्या हातावर जाणे
दम लागणे, विनाकारण घाम येणे, कोरडा खोकला, अस्वस्थता ही लक्षणं जास्त तीव्रतेने जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराचा धक्का आल्यास काय करावे?
तुम्हाला स्वत:ला याचा त्रास जाणवल्यास शांतपणे पडून राहावे, तसेच मदतीसाठी तातडीने कुणाला तरी संपर्क करावा. जास्त हालचाल करु नये, स्वत: चालत इकडे-तिकडे जाण्याचा प्रयत्न करु नये. तसेच पुर्वीपासून या आजाराची माहिती असल्यास अ‍ॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या गोळ्याचे सेवन करावे. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवावी.

महत्त्वाच्या बातम्या-
नाश्त्याला चहा चपाती खाण्याची चूक करताय तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
वाह रे पठ्ठ्या! उच्च शिक्षण घेऊन ‘हा’ तरुण करतोय कुंभार काम; कारण ऐकून कौतुक वाटेल
टाटा बाजारात आणणार सर्वात स्वस्त SUV कार, वाचा काय आहे किंमत आणि फिचर्स
विश्वास ठेवा! हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडिओ पाहिला का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.