आरोग्यमंत्र्यांचे महिला सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध? ऑफिसच्या बाहेर घट्ट पकडून तिला किस्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

लंडन । अनेकांचे लग्न झाले असले तरी बाहेर प्रेमप्रकरण असल्याच्या घटना आपण आतापर्यंत अनेक पाहिल्या आहेत . व हे प्रेमप्रकरण दीर्घकाळ न टीकता कधी ना कधी समोर येतंच. मात्र असच एक धक्कादायक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक हे महिला सहकाऱ्यासोबत चुंबन(किस) करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. व हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने ते व्हायरल झाले आहे. ज्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. संपूर्ण घडलेल्या प्रकारानंतर आता आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांच्या समस्येत वाढ झाली आहे. ज्या महिलेला आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी किस केलं ती महिला कोण आहे पाहुयात.

जिना कोलाडांगेलो असं या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिना यांना त्यांनी मागील वर्षीच करदात्यांच्या पैशातून नोकरी दिली होती. द सन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने याचा खुलासा केला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, 42 वर्षीय आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक जिना कोलाडांगेलोला किस करताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयात त्यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. हे फुटेज गेल्या महिन्याच्या 6 तारखेचं असल्याचं म्हटलं जात आहे. हॅन्कॉक यांनी 15 वर्षापूर्वी मार्था होयर मिलर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती आणि त्यांनी तीन मुलं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय जीना ऑलिव्हर बोनास या फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोअरमध्ये संप्रेषणांच्या संचालक आहेत. त्या लॉबींग फर्म ल्यूथर पेंड्रागनमध्ये एक दिग्दर्शक आणि प्रमुख भागधारकदेखील आहे. जिनादेखील विवाहित आहेत आणि त्यांना तीन मुलं आहेत. जिनाचे पती ओलिवर ट्रेस हे फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोर ओलिवर बोनासचे मालक आहेत.

मात्र आता या दोघांच्या सिक्रेट अफेअरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका व्हिस्लब्लोअरने सांगितले, की ते दोघं नियमितपणे एकत्र दिसतात. एका सूत्रानं असं म्हटलं आहे, की करदात्यांच्या पैशानं कामावर घेतलेल्या सहकाऱ्यासोबत कोरोना महामारीच्या काळात आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांचे प्रेमसंबंध आहेत हे धक्कादायक आहे.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने विळखा घातल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोनापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हॅन्कॉक यांच्या कोरोना काळातील या प्रेमसंबंधांमुळे सर्वत्र खळबळ मांजली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.