मोठी बातमी! राज्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांचा उपचाराअभावी  मृत्यू होत आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंध लावत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १ मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र आता लॉकडाऊन वाढण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ३० एप्रिल या दिवशी लॉकडाऊन बाबत घोषणा केली जाईल असं टोपे म्हणाले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, कोरोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. राज्यात ब्रेक द चेनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लागू  केला आहे. निर्बंधाच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन वाढवायचा की काय करायचा याबाबत चर्चा होईल.  ब्रेक द चेनचे नियम १५ दिवस वाढवले जाऊ शकतात. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

१८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण होणार नाही

राज्याला ८ लाख लसींची गरज आहे. मात्र सध्या राज्याला १ लाख लसींचे डोस मिळत असल्याने १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण सुरू करणं शक्य नाही. मात्र मे च्या शेवटच्या आठवड्यात लस मिळाल्या तर लसीकरण करता येईल. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

देशात कोरोनाने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशात आज कोरोनाच्या ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेमध्ये भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अरे हाड..आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेतल्या प्रत्येकाला; मराठमोळा अभिनेता राजकारण्यांवर संतापला
कोरोना लस किती कालावधीपर्यंत सुरक्षा देऊ शकते, वाचा संशोधक काय म्हणतात…
“हिम्मत असेल टीका करण्यापेक्षा, किरीट सोमय्या यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी” 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.