आरोग्यमंत्र्यांनी पुरावे सादर करावे अन्यथा मंत्रिपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा- मनसे

मुंबई | महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २० हजार  कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

परंतु, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीवर मनसेने आक्षेप केला आहे. १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सादर करावे.

अन्यथा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा. अशी मागणी मनसेने केली आहे.

यासंबंधीची फेसबुक पोस्ट मनसे नेते गजानन काळे यांनी केली आहे.

त्यांनी पुढे असेही सांगितले की, मुळातच महात्मा फुले जनआरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते.

हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते. आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे. असे वारंवार सांगण्यात येते.

मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना, १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल? असा सवाल मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

राजेश टोपे खोटे बोलत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावे. अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.