भारतात तयार होणाऱ्या लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..

 

मुंबई | देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असताना यावर लस शोधण्याचे भारतात अथक प्रयत्न सुरू आहे.

आता कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या प्रयत्नातून पहिली भारतीय लस शोधण्याचे काम सुरू आहे.

याबाबत बोलताना, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळवल्यानंतर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

या कोरोना लसी संदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महत्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटलमध्ये या लसीबाबत क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात येणार आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ७ जुलै पर्यंत क्लिनिकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. असेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

तसेच १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन, पहिली भारतीय बनावट लस बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे, आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.