..तरच तिसरी लाट रोखता येऊ शकते; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगीतला नामी उपाय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नंतर तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता येत्या सण उत्सवाच्या काळात राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सध्या निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नाही.

संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. संख्या कुठे वाढते आहे? का वाढते आहे? यावर विशेष लक्ष आहे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. नागपूरच्या बाबतीत तेथील रुग्णसंख्येची आकडेवारी आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

केरळमध्ये ओनमच्या सणानंतर तिथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. एक- एक दिवसात ३१ हजरांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. गर्दी करून नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्यातच एकूण ७० टक्के रुग्णसंख्या आहे. यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल, तरच तिसरी लाट रोखता येऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ऑक्सिजन संदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले की, गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती. आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचे ४५० प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्ट्स उभारले आहेत. उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यान्वित होतील.

केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी ७०० टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरु करा अशा प्रकारची सूचना आरोग्य विभागाने काढली आहे . त्याला मुख्यमंत्र्यानी मान्यता दिली आहे.

पुढे ते म्हणाले, एका दिवसात १२ लाखांच्या वर लसीकरण करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे. लस अजून उपलब्ध झाल्या तर १२ ते १५ लाख लसीकरण रोज करता येईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता देता येऊ शकेल आणि पर्यायाने तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण करून तिसरी लाट थोपवायची असेल तर त्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
दुख:द बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन; वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास
“मराठीला अभिजात दर्जा मिळावा हा प्रस्ताव केंद्रात पाठवून ८ वर्ष झाली, मोदींचा मंत्री खोटं बोलतोय”

पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
किस्सा: जेव्हा पहिल्यांदा पुरस्कार आणि १५०० रूपये बक्षिस भेटल्यानंतर थरथर कापत होते कादर खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.