खरचं भात खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या यामागचे सत्य

मुंबई | आपल्यातील अनेकांचा भात खाल्ल्याने वजन वाढतं असा समज आहे. यामुळे अनेकजण एकतर भात कमी खातात किंवा अजिबातच खात नाहीत. मात्र खरच भात खाल्ल्याने वजन वाढते का? यामागचे नक्की कारण काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

भात खाल्ल्याने चरबी अजिबात वाढत नाही. तसेच कॅलरीचे प्रमाण देखील नियंत्रण असते. त्यामुळे अनेक आहार तज्ञ हे नियमित आहारामध्ये भाताचा समावेश करावा, असे सांगत असतात. यामुळे भात खाल्ल्याने वाजण वाढते हा गैरसमज आहे.

मात्र जर आपण फक्त भात आणि वरण खात असाल तर लक्ष द्या. आपण तुपात सोबत भात खात असल्यास यामध्ये कॅलरीचे प्रमाण हे वाढू शकते. त्यामुळे फक्त साधा भात खाल्ला पाहिजे. जर तुपासोबत आपल्याला भात खायचा असेल तर अतिशय कमी प्रमाणात तूप घ्यावे.

तसेच भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे बराचवेळपर्यंत तुमचे पोट भरलेल्यासारखे वाटते, भूक लागत नाही. त्यामुळे भात तयार करताना तुमच्या आवडत्या भाज्यांसोबत तो बनवावा. पांढऱ्या तांदळापेक्षा लालसर रंगाच्या तांदळात जास्त फायबर्स आणि कॅलरीज कमी असतात.

दरम्यान, अनेक आहार तज्ञ सांगतात की, भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. परंतु, एक वाटी पेक्षा अधिक भात रोजच्या आहारामध्ये समावेश केला तर, याचबरोबर यापेक्षा जास्त भात खाल्यास आपले वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काळजी घ्या.

 

महत्त्वाच्या बातम्या
खाद्य तेलात ‘अशा’ प्रकारे बदल करुन टाळा लठ्ठपणा; तज्ज्ञांचा सल्ला
संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते
अक्षयकुमारच्या सासुसोबत सनी देओलचे तब्बल ११ वर्षे अफेअर सुरू होते; घरी समजल्यावर मात्र..
हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.