..म्हणून गुणकारी खजुराचा आहारात करा समावेश

आपण आरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. खास करून फळे आणि ड्राय फ्रुट आपण जास्त प्रमाणात खातो. ड्राय फ्रुट खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तसेच खजूर देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

असे बोलले जाते की, थंडीच्या दिवसात आरोग्यदायी राहण्यासाठी खजूर खायला हवेत. कारण खजूर खाण्याने अनेक फायदे होतात. जाणून घेऊया खजूर खाण्याचे फायदे.

खजुरामध्ये कॅलशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामूळे हाड मजबूत होतात. सकाळी सकाळी खजूर खाल्याने तुमच्या शरीराला फायदा होतो. तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील तर मग रोज खजूर खा.

खजुरामध्ये लोहही प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामूळे तुम्हाला हिमोग्लोबिनचे वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात. हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी रोज खजुराचे सेवन करा.

एखाद्या वेळेस तुम्हाला अचानक थकवा जाणवला तर २ ते ३ खजूर खाल्याने फायदा होतो. कारण खजुरामध्ये ग्लुकोज असते. त्यामूळे आपला थकवा लगेच दुर होऊन आपण फ्रेश होतो.

अनेकांच्या रक्ताची कमी असते. त्यामूळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाला पण असा त्रास होत असेल तर मग रोज खजूर खा. खजुराने रक्त वाढण्यास मदत होते. त्यामूळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

खजुरामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन खुप अधिक प्रमाणात असतात. त्यामूळे तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर मग रोज खजूर खा. त्यासोबतच खजुरामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते. त्यामूळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.

खजूर हा ‘व्हिटॅमिन अ’ चा उत्तम स्रोत आहे. त्यामूळे दृष्टी चांगली राहते. कॅन्सरच्या रुग्णांसाठी देखील खजूर चांगले फायदेशीर आहेत. आतडे, स्तन आणि फुफुसांचा कॅन्सर असेल तर रोज खजूर खा.

तुम्हाला सर्दी झाली असेल तर मग तुम्ही दुधामध्ये खजूर, काळी मिरी आणि विलायची भिजू घाला. रात्री झोपण्यापूर्वी हे दुध प्या. या दुधाने तुमची सर्दी कमी होण्यास मदत होते. अशा या गुणकारी खजुराचा आपल्या आहारात नक्की समावेश करा.

महत्त्वाच्या बातम्या –

गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल; पुरूषांसाठी तर लई भारी

डोक दुखत असेल तर हे भन्नाट घरगुती उपाय करा; डोकेदुखी कुठल्या कुठे पळून जाईल

नवरात्रीचे नऊ दिवस उपवासात ‘हा’ आहार घ्या आणि वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती

अमृतापेक्षा कमी नाही देशी गाईचे दूध; मेंदू व पोटाच्या विकारांवर तर रामबाण; जाणून घ्या फायदे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.