कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी मिळवला कोरोनावर विजय

 

मुंबई। कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी आज कोरोनावर विजय मिळवला आहे.

डॉ. संजय ओक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजन देण्यात आला होता.

दरम्यान TV9 ने प्रसारित केलेल्या बातमी नुसार डॉ. संजय ओक यांनी आज कोरोनावर विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये घेत असलेल्या यशस्वी उपचारामुळे ओक यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रत्यक्ष उपचार करणार्‍या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिलमध्ये विशेष टास्क फोर्स स्थापन केले होते.

या टास्क फोर्सकडून राज्यातील संपूर्ण कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. अशा या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.