लहान असताना आईबरोबर बांगड्या विकायचा; आज आहे आयएएस अधिकारी

प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. काही लोकांना कमी प्रयत्न करूनही फळ मिळते तर काही लोकांना रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते. परंतु जेव्हा माणूस कठोर परिश्रम करून यश मिळवतो तेव्हा यशाचा आनंद काही वेगळाच असतो.

आज आपण अश्याच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीने पडेल ते काम करून आणि अतोनात परिश्रम करून यश प्राप्त केले आहे. ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील सोलापुरात जन्मलेले रमेश घोलप होय.

रमेश घोलप यांच्या आयुष्यात एक वेळ अशी होती की स्वतःच्या पोटासाठी त्यांनी त्याच्या आईबरोबर बांगड्या विकण्याचे काम केले होते. तेच रमेश घोलप आज आयएएस अधिकारी आहेत. त्याच्या कठोर प्रयत्नांना यश मिळाले.

गरीब घरात जरी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी कधी कठीण परिस्थितीत हार मानली नाही. परिश्रम केले की फळ एक ना एक दिवस नक्की मिळते हेच मनात ठेऊन त्यांनी ते प्रयत्न करत राहिले. त्यामुळेच ते कोट्यावधी तरुणांसाठी प्रेरणास्थानी आहे.

रमेश यांचे वडील पंचर शॉपमध्ये काम करून त्याच्या कुटुंबाचे संगोपन करत होते. पण त्याचं जास्त पिणे त्याच्यासाठी प्राणघातक ठरले. कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी रमेश यांच्या आईने खेड्यात बांगड्या विकण्यास सुरुवात केली.

रमेश आणि त्यांचा भाऊ या कामात आईला मदत करू लागले. परंतु काळाने घात केला आणि रमेश यांच्या डाव्या पायावर पोलिओचा संसर्ग झाला. अशी एकामागून एक संकटाना सामोरे जावे लागत होते.

रमेश याच्या गावात फक्त प्राथमिकच शाळा होती. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या काकांकडे पाठवण्यात आले. रमेश यांना परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे त्यांना माहित होते की फक्त शिक्षणच त्यांच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर करू शकते.

रमेश अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी अधिक अभ्यास केला आणि त्यांच्या शिक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या वडिलांच्या मृत्युच्या वेळी ते बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करत होते. अश्या वेळी वडिलांच्या अंतिम संस्कारात सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

शेजारऱ्यांच्या मदतीने ते वडिलांच्या अंतिम संस्काराला पोहचले. वडिलांच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला परंतु त्यांनी हार न मानता १२ वीत ८८% मिळवले. बारावीनंतर त्यांनी डिप्लोमा केला आणि २००९ मध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत झाले. पण त्यावर ते थांबले नाही.

त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि आयएएस परीक्षेची तयारी सुरु केली. अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी सिव्हील परीक्षेत २८७ व क्रमांक मिळवला. मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

हे ही वाचा-

तरुणांनाही लाजवेल असा भन्नाट डान्स करताय आजोबा; पहा आजोबांच्या ठुमक्यांचा व्हिडिओ

VIDEO; तेरे ही सपने अंधेरों में उजालों में पाकिस्तानी तरुणीवर चाहते पुन्हा घायाळ

मोठी बातमी! टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामी आरोपी घोषित

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.