गुगलची नोकरी सोडून सुरु केले स्वत:चे किचन, आता कमवतोय तब्बल ५० लाखांचे उत्पन्न…

मुंबई । आपल्याला गुगल, फेसबुक अशा ठिकाणी नोकरी मिळाली तर किती भारी होईल, असे कायम वाटत असत. तशी नोकरी मिळाली की आपले आयुष्य सेट असे आपल्याला कायम वाटते.

मात्र मुंबईतील एका तरुणाने थेट गुगलची नोकरी सोडली आहे. गुगलची नोकरी सोडून या तरुणाने स्वतःच किचन सुरु केले आहे. या तरुणाचे नाव आहे मुनाफ कपाडिया.

मुनाफ कपाडिया हा बोहरी समाजाचा. त्यामुळे बोहरी समाजातील जेवणाची चव सगळीकडे पोहोचावी आणि या जेवणाचा आनंद सर्वांना मिळावा असा विचार त्याने केला.

मुनाफने आईच्या मदतीने स्वतःच किचन सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुनाफच्या ग्राहकांना त्याच्या जेवणाची चव आवडली. या व्यवसायाच्या जोरावर मुनाफने आपली गुगलमधील अकाऊंट स्ट्रॅटजिस्टची नोकरी सोडली.

सुरवातीला मुनाफला हव्या तेवढ्या ऑर्डर्स मिळत नव्हत्या. त्यामुळे त्याने धंदा बंद करण्याचाही विचार केला. मात्र अचानक त्याला फोर्ब्स मासिकातून फोन आला.

त्यांनी मुनाफची सक्सेस स्टोरी फोर्ब्समध्ये छापणार असल्याची माहिती दिली. याने मुनाफचा आत्मविश्वास वाढला, आणि त्याने स्वतःला या व्यवसायात अधिक मेहनतीने झोकून दिले.

मुनाफच्या किचनमधील थाळी बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यांनी चाखली आहे. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर, ह्रितिक रोशन आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. सध्या मुनाफ या व्यवसायातून वर्षाकाठी तब्बल ५० लाख रुपये कमवत आहे.

अनेक तरुण नोकरीच्या मागे धावत असतात. त्यातून कमी पगार असला तरी व्यवसाय करण्याचे धाडस ते करत नाहीत, मात्र अशाप्रकारे व्यवसाय केला तर भरपूर पैसे मिळू शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.