दोन वर्षांपासून BCCI ने थकवले पैसे; कोरोनाग्रस्त भावाच्या उपचारासाठी क्रिकेटपटू झालाय हतबल

मुंबई |  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांचा अत्यंतच धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात लस, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू  लागला आहे.

कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ  आली आहे.  सर्वसामान्य व्यक्तीं बरोबरचं कलाकार, खेळाडू यांच्यावरही मोठं आर्थिक संकट आलं आहे. अशातच बिहारमधील खेळाडूंच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे.

बिहारमधील २१ वर्षीय गोलंदाज प्रशांत सिंहला भारतीय क्रिकेट बोर्डाने तब्बल २ वर्ष खेळाचे पैसे दिले नाहीत. यामुळे खेळाडू प्रशांत सिंह निराश झाला आहे. त्याच्या कुटूंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या उपचारासाठीही प्रशांतकडे पैसे शिल्लक नाहीत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पैसे न मिळालेला एकटा खेळाडू नाही. त्याच्यासोबतच्या अनेक खेळाडूंना बीसीसीआय कडून पैसे मिळाले नाहीत. हे सर्वजण दोन वर्षांपासून पैसे मिळण्याची वाट बघत आहेत.

गोलंदाज प्रशांत सिंहच्या वडीलांचं २०१६ मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर कुटूंबाची संपुर्ण  जबाबदारी प्रशांतवर येऊन पडली. तरीही लोकांकडून उधारीवर पैसे घेऊन त्याने गेल्या वर्षी बहिणीचं लग्न केलं. आजूनही प्रशांत सिहं लोकांचे पैसे फेडत आहे.

कोरोनाची लाट आल्यानंतर प्रशांतच्या कुटूंबावर मोठा डोंगर कोसळला. वृध्द आईला श्वसनाचा त्रास आहे. तसेच भावालाही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आई आणि भावाला रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रशांतकडे पैसेही राहिले नाहीत. प्रशांतचे  गेल्या दोन वर्षांपासून बॅंकेत पैसे जमा झाल्याचा मॅसेज येईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

बिहार क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राकेश तिवारी म्हणाले की, खेळाडूंचे व्हाऊचर जमा करण्याच्या वेळेस चुका झाल्या होत्या.  आम्ही नव्याने व्हाऊचर बनवून बीसीसीआयला पाठवले आहेत. लवकरात लवकर सर्व खेळाडूंना पैसे मिळतील.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू बनला आमदार; पहिल्यांदाच खेळणार राजकीय खेळपट्टीवर
मोठी बातमी! क्रिकेटपटू के एल राहूलची प्रकृती बिघडली; उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले
बॉलीवूडच्या अभिनेत्रीच नाही तर ‘या’ अभिनेत्यांनी देखील केला आहे रंगभेदाचा सामना

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.