सेल्समनचं एकाच वेळी तब्बल ३५ महिलांसोबत होतं लफडं; अन् त्यानंतर जे घडलं…

टोकियो | प्रेम करावं पण ते योग्य व्यक्तीवर करावं असं बोललं जात. प्रेमाचं खोटं नाटक करून धोका दिल्याच्याही घटना घडत असतात. एकटेपणाचा गैरफायदा घेत समोरील व्यक्तीला जाळ्यात अडकवल्याच्या घटना आजूबाजूला घडत असतात.

जपानमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ती वाचून संताप आल्याशिवाय राहणार नाही. एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल ३५ पेक्षा जास्त महिलांना प्रेमाचं खोटं नाटक करून जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर महिलांना गोड बोलून त्यांच्याकडून महागडे गिफ्टस, पैसे उकळले.

ताकाशी मियागावा असं त्या नराधम मजनूचं नाव आहे. ताकाशी हा पोटासाठी सेल्समन म्हणून काम करत होता.  घरोघरी जाऊन वस्तू विकायचा आणि यादरम्यान त्याने गोड बोलून महिलांशी ओळख करण्यास सुरूवात केली. महिलांशी चांगली ओळख झाल्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा.

एका स्थानिक मिडियाने दिलेल्या माहितीनुसार, ताकशीचा वाढदिवस १३ नोव्हेंबरला असतो. परंतू त्याने एका महिलेला २२ फेब्रूवारीला वाढदिवस असल्याचं सांगितलं. दुसऱ्या महिलांना जुलै आणि एप्रिल महिन्यात वाढदिवस असल्याचं सांगायचा.

ताकाशी  हे सर्व फक्त महिलांकडून महागडे गिफ्ट, पैसे, नवीन कपडे मिळावे यासाठी करायचा. पण काही दिवसांनी  ताकाशीवर महिलांना संशय येऊ लागला. अखेर ताकाशीचा भंडाफोड झाला आणि महिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी ताकाशीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. ताकाशीला स्वत:चे राहण्यास घरही नाही आणि केवळ हव्यासापोटी हे कृत्य करत होता. महिलांना याची माहिती झाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनचं सरकली आहे.

महत्वाच्या बातम्या-
माजी मंत्र्याची मुलगी मारतेय झाडू, तर मंत्र्याचा मुलगा उचलतोय गाद्या; रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं
ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ
कंगणा म्हणते, पंंतप्रधान मोदी देशासाठी पित्यासमान आहेत; पंतप्रधान म्हणजेच देश आहे
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.