रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र

जळगाव | जळगाव शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. भावाच्या पत्नीवरच दिराने बाथरूममध्ये बला.त्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक वर्षापुर्वीच या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम दिराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंकेला जाण्यासाठी जागी झाली असता दिराने तिच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तिला दिराने बाथरूममध्ये नेऊन बला.त्कार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने या घटनेची माहिती तिच्या बहिणीला दिली. त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिरावर गुन्हा दाखल करत त्याला फुले मार्केट परिसरातून ताब्यात घेतले.

महिला पोलिस उपनिरिक्षक कांचन काळे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय बाविस्कर, सचिन चौधरी, इम्रान सय्यद, सचिन पाटिल यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब
अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे
मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
११ वर्षांच्या मुलाने काढला आई-वडिलांचा अश्लील फोटो, युट्युबवर हॅकिंग शिकून मागितली खंडणी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.