आधी वडील वारले, नंतर आईनेही आत्महत्या केली; तरीही हिंमत न हारता बनला पोलीस

चेन्नई | अथक परिश्रम करून आपले स्वप्न अनेकजण साकार करत असतात. त्यासाठी दिवसरात्र अभ्यास करून ते यश प्राप्त करत असतात.  घरची परिस्थिती गरीबीची असूनही कामं करून मेहनतीच्या जोरावर मोठमोठ्या पदांवर झेप घेतात. अशाच एका जिद्दीने नाव मोठं करणाऱ्या ध्येयवेड्या तरूणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गरीबीचे झळ सोसत पोलिस झालेल्या तरूणाचे नाव आहे मणिकंदन. मणिकंदनच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. मणिकंदनच चांगले शिक्षण घेऊन पोलिस दलात रूजू होण्याचं स्वप्न होतं.

मणिकंदन लहान असतानाच त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरवलं. त्यामुळे त्याच्या आईवर आणि त्याच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. पण तरीही मणिकंदनच्या आईने मुलाला चांगल शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी त्याला अनाथालयात पाठवलं. जेणेकरून त्याला तिथे शिक्षण घेता येईल.

मणिकंदनला आई अनाथाश्रमात भेटायला येत असे. एके दिवशी त्याची आई भेटायला आली. मात्र मणिकंदन शाळेत गेला असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्या घरी निघून गेल्या. त्यानंतर मणिकंदनला कळले की आईने पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.

पहिल्यांदा वडिलांचा आधार गेला. त्यानंतर आईनेही जगाचा निरोप घेतल्याने त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. हे सर्व घडल्यानंतर मणिकंदन खचून गेला होता. मात्र एक दिलदार व्यक्ती मणिकंदनसाठी धावून आल्याने त्याचं आयुष्य बदलून गेलं.

लहानपनापासून अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या मणिकंदनची एका मोठ्या डॉक्टरने पालपोशनाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं या डॉक्टरने सांगितलं.

मणिकंदन अभ्यासात हुशार होता. त्याने उच्चशिक्षण घेऊन क्रिमिनॉलॉजी विषयात पदवीधर झाला. त्याच्या मेहनतीला यश मिळत होते. त्याने सशस्त्र राखीव पोलिस दलात भरती निघाल्याने त्यासाठी अर्ज केला. यामध्ये १३००० उमेदवरांची निवड करण्यात आली. मणिकंदन यानेही या परिक्षेमध्ये पास होत ४२३ व्या क्रमांकावर त्याची निवड करण्यात आली. मणिकंदन अम्बत्तूर औद्योगिक क्षेत्राच्या पोलिस ठाण्यामध्ये नोकरी करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी नाही सुशांतनेच मला सोडलं, अंकिता लोखंडेने केला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा
“खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”
डेलकर आत्महत्या प्रकरणी भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी होता देशमुखांचा दबाव – परमबीर सिंग
अखेर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला, शिवदीप लांडेच्या फेसबुक पोस्टने पुन्हा खळबळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.