महाराष्ट्रात ढगफूटीचा कहर! आतापर्यंत देशात एक नंबर; वाचा तज्ञांचा इशारा

औरंगाबाद। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगफुटी झाल्याने अनेक गावच्या गाव पाण्याखाली गेल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात शेती व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक गावांचे एकमेकांशी संपर्क तुटला. तसेच सर्व रस्ते व पुलांना नदीचे स्वरूप आले. तसेच अनेक लोकांनी आपला जीव गमावला असून अनेक मुके प्राणी पाण्यातून वाहून गेले.

हे भयंकर पावसाचे रौद्ररूप पाहून नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले. अशातच यावर्षी महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी (ता. ७) एका दिवसात राज्यात तब्बल ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली. यात सर्वाधिक म्हणजे ४२ ढगफुटी एकट्या मराठवाड्यात झाली. उर्वरित ढगफुटी महाराष्ट्राच्या अन्य भागात झाली आहे.

प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले की, मॉन्सून पॅटर्न बदलला आहे. मॉन्सून बरोबरच चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटीचा पॅटर्न बदलाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटीच्या ‘हिटलिस्ट’वर आहे.

मॉन्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने बदललेला बाष्पीभवन दर कारणीभूत आहे.त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करीत सेंद्रिय खतांनी ऑरगॅनिक कार्बन वाढवीत आयुर्मान वाढवत घराघरांत शिरणारा कॅन्सर रोखणे शक्य आहे’’, असे प्रा. जोहरे म्हणालेत आहेत.

ढगफुटी झाल्यानंतर काय परिणाम होतो?

कमी वेळात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे रस्ता उखडून जातो. मोठमोठे खड्डे पडतात. घरे किंवा भिंती पडतात. लाखो लीटर पाणी आल्याने गाळ जमतो व गाय-बैल-म्हैस अशी मोठी जनावरे, दुचाकी-चारचाकी वाहने तर कधी ट्रकसारखी मोठी वाहनेही पाण्यात वाहून जाऊ शकतात; म्हणूनच अशा पावसाला ढगफुटीला फ्लॅशफ्लड म्हणतात.
महत्वाच्या बातम्या
ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! ‘ह्या’ तारखेपासून गॅस आणि PNG प्रचंड महागणार 
अखेर गुपित फुटलेच! मुलांची नाव तैमुर व जहांगीर का ठेवली? करीनाने स्वतःच केला खुलासा…
भारत-इंग्लंडचा शेवटचा कसोटी सामना का रद्द झाला?; दिनेश कार्तिकने सांगितली इन्साईड स्टोरी 
त्या रात्री भारतीय खेळाडू रात्री ३ वाजेपर्यंत झोपू शकले नाही; भारतीय खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांना दिनेश कार्तिकचे उत्तर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.