तुम्ही मला निर्वस्त्र कधी पाहिले? राखी सावंतचा विधानसभा अध्यक्षांना थेट सवाल

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची जीभ घसरली होती. भाषण देताना, मी ६ हजार पुस्तकं वाचली आहे आणि त्याचे विश्लेषणही केले आहे, असे त्यांनी म्हटले होते.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गांधी कमी कपडे घालायचे. त्यांना देश बापू बोलत असे. परंतु असे नाही की कमी कपडे घालून कुणी बौद्धिक होते. कमी कपडे घातल्याने किंवा उतरविल्याने कुणी मोठं बनत असतं, तर आज राखी सावंत महात्मा गांधी यांच्या पेक्षाही मोठी झाली असती, या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता यावर राखी सावंत ने ह्रदय नारायण दीक्षित यांना उत्तर दिले आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. राखी म्हणाली, मला नाही माहिती माझ्यामागे सर्व भारतातील मंत्री, राजकीय लोक निरमा, सर्फ, घेऊन हात धुऊन का मागे पडले आहेत? मला या लोकांवर हसू येते, असेही तिने म्हटले आहे.

देशासाठी यांना बोलायचे आहे. यांना देशासाठी काम करायचे आहे. त्यांनी त्यांचे काम सोडून माझ्या शरीरावर लक्ष देऊ नये. मी कपडे घालते की नाही. किंवा मी निर्वस्त्र राहते. याकडे डोळे लावू नये. अध्यक्ष साहेब तुम्ही मला निर्वस्त्र कधी पाहिले? असा प्रश्न तिने विचारला आहे.

तसेच हृदय नारायण दीक्षित हे आजोबांच्या वयाचे आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या नाती संदर्भात बोलताना विचार करायला हवा, असेही तिने म्हटले आहे, यामुळे तिने चांगलेच खडसावले आहे. या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.

याबाबत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दीक्षित यांनी एक ट्विट करत केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले होते. या ट्विटमध्ये, माझ्या वक्तव्याची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. ती क्लिप संदर्भहीन आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.