तुम्ही उडणारा खराखुरा ‘Harry Potter’ पाहिलाय का? नसेल पाहिला तर एकदा व्हिडिओ पहाच

मुंबई । सध्या सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात बहुतेक व्हिडिओ हे जीवघेणे स्टंटचे असतात तर काही व्हिडिओ मनोरंजनाचे असतात. अशातच सध्या अनेक लोक सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याने साधे व्हिडिओ देखील लगेच व्हायरल होतात.

मात्र काही व्यक्ती असे असतात, जे प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊन धक्कादायक स्टंट करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा आगळावेगळा आहे. यात एक व्यक्ती स्वतःची जीवाची पर्वा न करता कारनामा करत आहे, ज्यात एक व्यक्ती हवेत उडत आहे.

अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवू शकत नाही पण चित्रपटांमध्ये पाहतो. त्यात उडणारी माणसं, स्पायडर मॅन, क्रिश, सुपरमॅन, शक्तिमान असे अनेकजण चित्रपटांमध्ये पाहिले आहेत. मात्र न्यूयॉर्कमध्ये एका उडणाऱ्या माणसाला पाहिले गेले आहे.

ज्यामुळे येथील अनेक लोकांना धक्का बसला आहे, तर अनेकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात टिपले आणि त्याला सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हा व्हिडिओ ट्विटरच्या ‘Rex Chapman’ नावाच्या अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा माणूस एखाद्या जादूगारा प्रमाणे हवेत उडतो आणि एखाद्या ड्रोनसारखा होवरबोर्डवर सवारी करत हवेत उडत आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 80 लाख लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. व सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या
‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने केला ‘हा’ मोठा कांड, नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव
काळजी वाढली! महाराष्ट्र या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जाणून घ्या सविस्तर
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.