‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेला कार्यक्रम. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा-घरात हा कार्यक्रम पोहचला आहे. यासोबतच या कार्यक्रमातील कलाकार मंडळीदेखील प्रेक्षकांना आपलेसे वाटायला लागली आहेत. कार्यक्रमातील निखळ विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.
या मालिकेतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातुन लोकांशी जुळलेले असतातच. याच मालिकेतील कलाकार प्रभाकर मोरे यांच्याबद्दल एक बातमी आता समोर आली आहे. प्रभाकर मोरे यांच्या चाहत्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. विनोदाला शोभेल असा अभिनय तसेच त्यांची विनोदाची शैलीबद्दल चर्चा होत असता.
प्रभाकर मोरे आता राजकारणात दिसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यांनी एका राजकीय पक्षांमध्येही प्रवेश केल्याचे कळते आहे. यामुळे प्रभाकर मोरे चांगलेच चर्चेचा विषय बनलेले आहेत. एका टीव्ही वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर मोरे हे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या चर्चा आहेत.
मागील अनेक दिवसांपासून मनोहर प्रभाकर मोरे यांचा राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा होताना दिसत होत्या. परंतु ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार यात मात्र सगळ्यांना शंका होती. अखेर ही अखेर ही सर्वांची शंका दूर झाली असून प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरे यांनी घड्याळाची संगत धरली आहे.
प्रभाकर मोरे यांच्या राजकीय प्रवेशाने सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकताच पक्षात प्रवेश केल्यानंतर अजितदादा पवार यांनी त्यांना लगेचच एक जबाबदारी सोपवली आहे. त्यांना कोकण सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रभाकर मोरे यांनी अनेक चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केलेले आहे. पांघरून, बाई गो बाई ,टकाटक, कुटुंब, कट्टी बट्टी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील त्यांच्या विनोदी शैलीची प्रेक्षकांना पसंती आहे.
महत्वाच्या बातम्या
Omkar bhojane : हास्यजत्रा का सोडली? अखेर ओंकार भोजनेने सोडले मौन; सांगितले ‘हे’ वेगळेच कारण
रितेश भाऊचा नादच खुळा…! ‘वेड’ने १६ व्या दिवशी रचला इतिहास; केला ‘हा’ अनोखा विक्रम
“… तर भीमा कोरेगावला जाऊन बघा”; महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत