“हसन मुश्रीफ म्हणजे कोल्हापूरचे पैलवान आहेत, ते कोणालाच ऐकणार नाहीत”

मुंबई । भाजप नेते किरीट सोमय्या राज्य सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपासून ठाकरे सरकार विरोधात रान उठवले आहे. अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप केले गेले आहेत. यामुळे सोमय्या चर्चेत आले आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करत ते कोल्हापूरला चालले होते.

आता शिवसेनेने देखील हसन मुश्रीफ यांची बाजू घेतली आहे. सामनातून म्हटले आहे की, हसन मुश्रीफ म्हणजे कोल्हापूरचा पैलवान आहेत. ते कोणालाच ऐकणार नाहीत. किरीट सोमय्या यांना पळून जावे लागले आहे. असे म्हणत शिवसेनेने मुश्रीफ यांना समर्थन केले आहे.

उठ की सुट काही बोलायचे, कोणावरही आरोप करायचे, झोपताना आरोप, उठताना आरोप या शब्दात सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे. मुश्रीफ यांच्या वादात आता शिवसेना मुश्रीफ यांच्यासोबत दिसत आहे. काही दिवसांपासून किरीट सोमय्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत.

सोमय्या त्यांनी यामध्ये थेट शरद पवार यांचे नाव देखील घेतले आहे. ते म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब १२७ कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का? असे त्यांनी म्हटले आहे.

सेनापती घोरपडे कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. हे सरकार पवार आणि ठाकरे चालवतात, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

ते म्हणाले, अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असे ते म्हणाले. काल ते कोल्हापूरमध्ये जात असताना त्यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवले. आता सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.