Share

Hasan Mushrif on Laxman Hake: हाकेंवर मुश्रीफांचा हल्लाबोल, म्हणाले , “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, त्याचा बंदोबस्त…”

Hasan Mushrif on Laxman Hake:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी अमर्याद भाषा वापरणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हाके यांच्यावर अप्रत्यक्षपणे चपराक मारताना त्यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली. “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. त्याचा बंदोबस्त शांतपणे, योग्य पद्धतीने करावा लागतो,” असे ते म्हणाले.

मिटकरी यांचीही प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही आपली नाराजी व्यक्त करत, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत इतर नेत्यांच्या पक्षांच्या तुलनेत दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. “राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल एकाने पोस्ट लिहिली, तर मनसेचे (MNS) कार्यकर्ते लगेच कृती करतात. भाजपचे (BJP) कोणी काही बोलले, तर पक्ष पूर्णपणे तुटून पडतो. मात्र, अजित पवार यांच्यावर हाके बोलतो, आणि कोणीही त्यावर बोलत नाही. हे दुर्दैवी आहे,” असे मिटकरी म्हणाले.

शक्तीपीठ महामार्गाबाबत हसन मुश्रीफ यांची भूमिका

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मुद्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीपूर्वीच ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती. कोल्हापूर (Kolhapur) मार्गाने हा महामार्ग जाण्याबाबत भूमिसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. जर चंदगड (Chandgad) भागातून शेतकऱ्यांना हरकत नसेल, तर तो मार्गही विचारात घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे – उद्धव ठाकरे मेळाव्यावरही प्रतिक्रिया

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आगामी एकत्रित मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “एका कुटुंबातील भाऊ एकत्र येत असतील तर शुभेच्छा देणे हे चांगले लक्षण आहे. मात्र, निवडणुकीत काय घडेल, हे जनताच ठरवेल.”

सीपीआर रुग्णालयातील मृतदेह प्रकरणात कारवाईचा इशारा

कोल्हापूरमधील सीपीआर (CPR) रुग्णालयात मृतदेहावरील हेडसांडसंदर्भात विचारले असता, हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, त्यांनी याबाबत तत्काळ बैठक बोलावली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जाईल.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now