Share

Panipat Assault Case: ‘मी बाळ गमावलंय, दया करा’ म्हणत राहिली, पण नराधमांनी ऐकले नाही, वैतागून घर सोडलं अन्…

Panipat Assault Case: हरियाणा (Haryana) राज्यातील पानिपत (Panipat) शहरात एका महिलेवर अतिशय निर्घृण आणि धक्कादायक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये तीन नराधमांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (gangrape) केल्याचा प्रकार घडला आहे.

महिलेच्या सांगण्यानुसार, साधारण महिन्यापूर्वी तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर ती मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. मात्र तिचा नवरा तिला सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी (forced physical relations) दबावत होता. २४ जून रोजीही त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने त्याला विरोध केला, तेव्हा त्याने तिच्यावर हात उचलला. इतकंच नाही, तर तिच्यावर बाहेर बलात्कार घडेल असे धमकीसदृश बोलसुद्धा त्याने उच्चारले.

या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिला घर सोडून निघून गेली. रस्त्यात तिला एक तरुण भेटला, त्याने आपुलकी दाखवत तिला मदतीचा बहाणा केला आणि रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. तेथे त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तिच्यावर अत्याचार केला. या नराधमांनी तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक दोन्ही पद्धतीने बलात्कार (natural and unnatural rape) करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिला रडत होती, विनवण्या करत होती की तिच्यावर दया करा, कारण नुकताच तिचा मुलगा गेलाय आणि ती अत्यंत अस्वस्थ आहे. पण आरोपींनी तिचं काहीही ऐकून न घेता आपली वासना भागवत राहिले.

त्यानंतर ती रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना एका ठिकाणी केमिकलमधून जात होती, त्यावेळी एक ट्रेन आली आणि तिच्या पायावरून गेली. यामध्ये तिचा एक पाय कापला गेला. सध्या तिच्यावर रोहतक पीजीआय (Rohtak PGI) येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत पानिपत जीआरपी (Panipat GRP)ने अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी एसआयटी (SIT) नेमण्यात आली असून, अंबाला जीआरपीच्या एसपी नीतिका गेहलोत (SP Neetika Gehlot) यांनी माहिती दिली आहे की पीडितेची मानसिक स्थिती स्थिर नाही, म्हणून तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now