बजरंगी भाईजानमधल्या ‘मुन्नी’ने स्विमिंगपुलमध्ये केला टायगर श्रॉफसारखा स्टंट; व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटात काम करणारी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

हर्षालीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून ती व्हिडीओमध्ये स्विमिंगपुलात एक स्टंट करताना दिसून येत आहे. ती या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसारखा स्टंट करताना दिसून येत असून ती स्विमिंग पुलातून उडी मारून बाहेर येत आहे.

हर्षालीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर काही तासातच ५ हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दाखवली आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंटदेखील केल्या आहे.

हर्षाली सध्या सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता तेव्हा तर तिला ओळखणेही कठीण झाले होते की ही तीच बजरंगी भाईजानमधली मुन्नी आहे का?

खरंतर तिला हर्षालीपेक्षा बजरंगी भाईजानच्या ‘मुन्नी’ या नावाने जास्त ओळख दिली आहे. जेव्हा बजरंगी भाईजानमध्ये तिने काम केले होते तेव्हा ती फक्त ७ वर्षांची होती. आता ती १२ वर्षांची आहे. त्यानंतर तिने अर्जुन रामपालच्या ‘नास्तिक’ चित्रपटात काम केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.