संविधान दिनाचा मुहूर्त साधत आज हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरियाणामध्ये अंबाला-पटियाला बॉर्डरवर अडवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संघर्ष पेटला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायामुळे विरोधी पक्षाकडून भाजपवर टिकांचा पाऊस पडत आहे.
आता यावर कॉंग्रेसने ट्विट करून भाजपवर टिका केली आहे. आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत कॉंग्रेसने ज्याने पिकवलेलं खाता, त्याच्याच नरडीचा घोट घेता? संविधान दिनादिवशीच शेतकऱ्यांचा घटनादत्त अधिकारांची गळचेपी करणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध! अश्या आशयाचे ट्विट केले आहे.
ज्याने पिकवलेलं खाता, त्याच्याच नरडीचा घोट घेता?
संविधान दिनादिवशीच शेतकऱ्यांचा घटनादत्त अधिकारांची गळचेपी करणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध! #अन्नदाता_पर_अत्याचार pic.twitter.com/h7pKuokHUK
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 26, 2020
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाविरोधात सातत्याने शेतकरी आंदोलने होत आहे. आजही हरियाणा, दिल्लीतील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. संतप्त शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे.
दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी अडवले. यावेळी हरियाणा पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धरपकड झाल्याचंही पाहायला मिळालं. पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स आंदोलक शेतकऱ्यांनी नदीत फेकून दिले.
तर पोलीसांकडून कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे शेतकऱ्यांवर मारले जात होते. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जाता होत्या. कडेकोट पहारा केला होता. आणि संविधान दिनादिवशीच पोलीस आणि शेतकऱ्यांचा संघर्ष पेटला होता.
पंजाबपासून सुमारे ५० ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये ५०० ते ६०० च्या संख्येने आलेले शेतकरी दिल्लीत प्रवेशाच्या तयारीत होते. कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे.
प्रेमाला वय नसते हे दाखवून देत मराठमोळ्या अभिनेत्रीने वयाच्या ६० व्या वर्षी केलं लग्न
‘या’ बॉलीवुड अभिनेत्रीने मारले साडीवर पुशअप्स, व्हिडिओ झाला व्हायरल