अन्वय नाईकांनी आईची ह.त्या करुन नंतर आत्मह.त्या केली अर्णबच्या वकीलांचा धक्कादायक युक्तीवाद

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अन्वय नाईक आत्मह.त्या प्रकरणी हायकोर्टाने दिलासा न दिल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सुनावणीदरम्यान गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला की, “अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्मह.त्या केली असावी.”

तसेच गोस्वामी यांच्या वतीने हरिश साळवे बाजू मांडत असून यावेळी त्यांनी युक्तिवाद करताना अन्वय नाईक यांनी कशा पद्धतीने आपल्या आईची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली हा दावा केला. याशिवाय अर्णब गोस्वामी यांनी सर्वांचे पैसे दिले होते हे कागदपत्रांमधून स्पष्ट होत असल्याचा दावा गोस्वामी यांच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान, हरिश साळवे यांनी यावेळी गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘एकामागोमाग एक गुन्हे दाखल केले जात आहेत. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पुन्हा सुरु करण्यात आलं, असे हरिश साळवे म्हणाले.

दरम्यान, ‘दंडाधिकाऱ्यांनी अर्नब गोस्वामी यांना वैयक्तिक बॉण्डवर सोडून द्यायला हवे होते. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले पाहिजे,’ असे मत मांडताना साळवे म्हणाले अर्णब गोस्वामी यांची सुटका केली तर आभाळ कोसळणार नाही,” असेही साळवे यांनी स्पष्ट केले.

 

महत्त्वाच्या बातम्या
रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
खळबळजनक! ‘अन्वय नाईक यांनी आईची ह.त्या करुन नंतर आत्मह.त्या केली’
संशोधनातून खुलासा; असा आवाज असणारे पुरुष धोकेबाज असतात, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.