Share

Hardik Pandya : आजच्या या स्पेशल दिवशी हार्दीक पंड्या बायकोला नव्हे तर ‘या’ खास व्यक्तीला करतोय मिस; व्हिडीओ व्हायरल

hardik pandya

Hardik Pandya : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आज 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तो आपला मुलगा अगस्त्याला मिस करत आहे. या प्रसंगी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. टीम इंडिया सध्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये दाखल झालेली आहे.

भारताने ऑस्ट्रेलियात एक सराव सामना खेळला होता ज्यात हार्दिकने 27 धावा केल्या होत्या. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत हार्दिकने म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त मी त्याला मिस करत आहे. माझा मुलगा हा माझी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अगस्त्य हार्दिकसोबत क्रिकेटमध्ये खूप रस घेत आहेत. त्याने वडिलांना एक बॅट भेट दिली आहे. अगस्त्य घरात वडिलांसोबत क्रिकेट खेळतानाही दिसतो. 31 मे 2020 रोजी हार्दिक पांड्याने त्याची मंगेतर नताशा स्टॅनकोविकशी त्याच्या लग्नाची घोषणा केली होती.

त्याने त्यावेळी सांगितले होते की ते दोघेही एका मुलाचे पालक होणार आहेत. दोघेही एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. नताशा एक सर्बियन मॉडेल आहे, ती एक अभिनेत्री देखील आहे. ती काही बॉलिवूड चित्रपटांचा भाग देखील आहे. बिग बॉस 8 मध्ये भाग घेऊन तिने लोकप्रियता मिळवली होती.

हार्दिकला केवळ त्याच्या मुलाचीच नाहीतर ऑस्ट्रेलियात त्याच्या पत्नीचीही आठवण येत आहे. त्याने पत्नी नताशासोबत त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की तो तिला मिस करत आहे. नताशानेही हाच फोटो तिच्या इन्स्टाग्राम फीडवर पोस्ट केला असून तिने हार्दिक आणि मुलगा अगस्त्य यांचा फोटोही पोस्ट केला आहे.

हार्दिकने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 62 एकदिवसीय आणि 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Shinde Group : “शिंदे गटाला RSS च्या बाळासाहेब देवरसांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला”
Dipak Kesarkar : दिपक केसरकर बाजारबुणगे, हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही, मंत्रीपदाचे गाजर दिसताच…
Mulayam Singh Yadav : फक्त राजकीय वारसाच नाही तर प्रचंड मोठी संपत्ती मागे ठेवून गेलेत मुलायमसिंग; आकडा ऐकून डोळे फिरतील

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now