Share

Hardik Pandya : हार्दिक पंड्याने बस ड्रायव्हरला दिले अनोखे गिफ्ट; ज्याला विकून तो करणार अनाथ मुलांची मदत

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. जिथे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तिथे टीम इंडियाने मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकून 2-0 ने कब्जा केला.

पण या मॅचनंतर सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी आणि धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

मात्र यावेळी तो वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनला असून, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिकने आपला मोठेपणा दाखवत बस ड्रायव्हरला एक खास भेट दिली आहे. खरंतर या भेटीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्याने आपली स्वाक्षरी केलेली टीम इंडियाची जर्सी बस चालकाला भेट दिली आहे.

हार्दिक पांड्याचा टी-शर्ट भेट म्हणून मिळाल्याने बस चालकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने हार्दिकचे जोरदार कौतुक केले.तो म्हणाला की, तो खूप दिवसांपासून बस चालवत आहे, पण पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने त्याच्याशी असे वागले.

एका क्रीडा पत्रकाराने बस चालकाची मुलाखत घेतली आणि त्यादरम्यान त्याने पंड्याचे कौतुक केले आणि सांगितले की ही जर्सी मला भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिली आहे. त्यावर सर्व खेळाडूंचे ऑटोग्राफ आहेत.

हार्दिकची स्वाक्षरी असलेली भारतीय संघाची जर्सी मिळाल्यानंतर बस चालक खूप आनंदी दिसत होता. इतर खेळाडूंनीही त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, व्हिडीओमध्ये तो स्पष्टपणे सांगत आहे की तो या जर्सीचा 31 मार्च रोजी लिलाव करणार आहे आणि त्यातून मिळालेली रक्कम वनथ चिल्ड्रन फाऊंडेशनला दान करणार आहे.

महत्वाच्या बातम्या
उज्ज्वल भविष्यासाठी व्यक्तिमत्व विकास महत्वाचा – प्रणिता गोडसे
Sanju Samson : टिम इंडीयात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनचा फिफा वर्ल्डकपमध्ये जलवा; वाचा कतारमध्ये नेमकं काय घडलं…
‘या’ मराठमोळ्या क्रिकेटपटूचा रुद्रावतार! एकाच ओव्हरमध्ये ठोकले ७ सिक्स; द्विशतक झळकावत केला विश्वविक्रम

ताज्या बातम्या खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now