कडक उन्हाळा (Hot Summer): उष्णतेमुळे रेल्वेचे सिग्नल वितळत आहेत, रेल्वे रुळ पसरत आहेत आणि रस्ते वितळत आहेत असे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण ते खरे आहे. हे होत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कोणत्याही उष्ण प्रदेशात घडत नसून ते युरोपमध्ये घडत आहे. तोच युरोप जो कडाक्याच्या थंडीसाठी ओळखला जातो.(Hot Summer, Railway Signals, Railways, Europe, Britain, Death)
युरोपातील उष्णतेमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगलांना आग लागली आहे. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १००० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनबद्दल बोलायचे झाले तर येथील तापमान ४१ अंशांच्या वर आहे. हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, इटली आणि तुर्कस्तानमध्ये अतिप्रमाणात उष्णता जाणवत आहे. स्पेन आणि फ्रान्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे तापमानात आणखी वाढ होत आहे. पोर्तुगालमध्ये गेल्या ७ दिवसांत उष्णतेमुळे ६५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये उष्णतेने रेल्वेची चाके ठप्प झाली आहेत.
उष्णतेमुळे रेल्वेचे सिग्नल वितळत असून रेल्वे रुळावर पसरत आहे. त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केवळ रेल्वे ट्रॅकच नाही तर रस्ते आणि विमानतळाची अवस्थाही चांगली नाही. उन्हामुळे रस्त्यांवरचे डांबर वितळू लागले आहे. ल्युटन विमानतळाची धावपट्टीही वितळू लागली आहे.
या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या राष्ट्रीय रेल्वे सेवेने लोकांना प्रवास टाळण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तापमान ४० अंश सेल्सिअस असते तेव्हा ट्रॅकचे तापमान ५० अंश, ६० अंश आणि अगदी ७० अंशांपर्यंत पोहोचते.
कडक उन्हामुळे लोक युरोपला फिरायला जात नाहीत. पूर्वी युरोप उन्हाळ्यात भरपूर पर्यटकांना आकर्षित करत असे. मात्र कडक उन्हामुळे पर्यटक येत नाहीत. येत्या काही दिवसांत स्पेन, फ्रान्स, इटली, ब्रिटनचा पारा आणखी वाढू शकतो, असे एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. कार्बन उत्सर्जन कमी झाले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Afghanistan: ‘सेक्ससाठी लग्न करतात तालिबानी’, महिला पत्रकाराने खुलासा करताच मिळाली तिला भयानक सजा
Raj thackeray: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, बोलतो वेगळं करतो वेगळं, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
रणवीर सिंगने न्युड फोटोशुट करून धुमाकूळ घातल्यानंतर दीपिकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…