हरभजनच्या मते मुंबईचा ‘हा’ खेळाडू म्हणजे भारताचा डिव्हीलीयर्स आहे

मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरी सगळीकडेच कौतूक होत आहे. सर्व मोठ्या खेळाडूंकडे सूर्यकुमारचे कौतूक होत आहे. त्यातच आता भारतीय स्पिनर एका कार्यक्रमात बोलताना दक्षिण अफ्रिकेचा सुपरस्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्ससोबत सूर्यकुमारची तुलना केली आहे.

हरभजन सिंगने सूर्यकुमार यादवची तुलना आरसीबीचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सशी केली आहे. हरभजनच्या मते, एबी डिव्हिलियर्सने ज्या प्रकारे चारही दिशांना शूट करतो त्याप्रमाणे सूर्यकुमार देखील आहे.

हरभजन म्हणाला की “सूर्यकुमार यादवचे गेम चेंजरपासून ते सामन्याचे विजेते म्हणून रूपांतर झाले आहे यात काही शंका नाही. त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि असं ही नाही की तो १०० च्या स्ट्राइक रेटने खेळतो. तर तो पहिल्याच बॉलपासून आक्रमक फलंदाजी करण्यास सुरवात करतो. ”

हरभजन सिंगच्या मते, सूर्यकुमार यादवला फलंदाजी करताना रोखणे खुपच अवघड आहे कारण तो चारही दिशांना शॉट मारतो. यामुळे तो भारताचा एबी डिव्हिलियर्स आहे. आश्याप्रकारे हरभजनने सुर्यकुमारची तुलना एबी डिव्हिलियर्ससोबत केली आहे.

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी केली. तिसर्‍या क्रमांकावर खेळताना त्याने सर्वाधिक धावा केल्या. या कारणास्तव, हरभजन सिंगसह अनेक दिग्गजांनी भारतीय संघात सूर्यकुमार नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

कोरोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्यांना सरकारने दिले दिवाळी गिफ्ट!

जर रोहित शर्मा १० नोव्हेंबरला फिट होता तर मग तो २७ तारखेसाठी फिट का नाही?

धोनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा तुम्हाला माहीत आहे का? वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.