कोरोनालसीबाबत हरभजनला आरोप करणे पडले महागात; मागावी लागली माफी

भारताचा क्रिकेटर हरभजन सिंग याने केलेल्या एका गोष्टीमुळे त्याला सार्वजनिक माफी मागावी लागली आहे. हरभजन सिंगने नुकतेच एक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्याने भारतीय नेते कोरोना व्हॅक्सिन घेत नाहीत, फक्त फोटो काढण्यासाठी नाटक करतात असा दावा केला होता. त्याचा हा दावा खोटा निघाला. त्यामुळे त्याला माफी मागितली.

एका व्हायरल व्हिडीओच्या आधारावर हरभजनने ट्विट केले होते. हरभजनने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले होते की, “वास्तविक आमचे नेते या पद्धतीनं व्हॅक्सिन घेत आहेत. फोटो निघाला. ओके गुड.” या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले.

या व्हिडीओमध्ये एक महिला आणि एक पुरुष व्हॅक्सिन घेताना फोटो काढत होते. त्यांनी फक्त कोरोना व्हॅक्सिन घेण्याचं नाटक केलं आणि फोटो काढला. असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात येत होता. या व्हिडीओतील बातमी खोटी असल्याचं थोड्याच वेळात सिद्ध झाले. हे ट्विट करण्यापूर्वी फॅक्ट चेक केली नसल्याचं हरभजननं मान्य केले आहे.

हरभजनने ट्वीट केल्यानंतर त्याच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढावली. या व्हिडीओचे सत्य समोर आल्यानंतर हरभजनने माफी मागितली. एका फॅननं तर त्याच्यावर देशाची बदनामी करण्याचा आरोप केला.

….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’

खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका

हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.