Share

Sharad Pawar : “शरद पवारांनी उध्दव ठाकरेची लाज राखण्यासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे”

uddhav thackeray and sharad pawar

Sharad Pawar : सध्या राज्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकी सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मतदार संघातून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी टक्कर होणार आहे. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे.(Sharad Pawar, Uddhav Thackeray, Andheri Assembly By-Election, Voters Union,)

या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. कारण या मतदार संघाचे आमदार रमेश लटके होते. पण त्याच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीत त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे.

अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, त्यामुळे भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले आहे.

आता या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता यावर भाजप नेते नितेश राणे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी ठाकरेंची लाज राखण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह धरला आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची लाज राखण्यासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे. मुरजी पटेल यांचे पारडे जड आहे. स्थानिक काँग्रेस-NCP नेत्यांनी उद्धव गटाचे काम करण्यास नकार दिला आहे. आज अंधेरीतील काँग्रेसच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.. दगाफटका पराभव मुळे तिघाडीत बिघाडीची शक्यता अधिक आहे, अशी फेसबूक पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी अंधेरी पुर्वची निवडणूकीवर लढवावी असे आवाहन का केले हेही सांगितले आहे. ते म्हणाले की, सगळ्या पक्षांनी हे आवाहन केले आहे. म्हणून मी हे आवाहन करत नाही. अर्ज परत घेण्याची मुदत अजून बाकी आहे. त्यापूर्वी हा निर्णय घेणे गरजेचे होते. ही निवडवणूक बिनविरोध करावी असे मला वाटते.

महत्वाच्या बातम्या
Shinde group : शिंदेंच्या ‘या’ बड्या आमदाराला वाटतेय पराभवाची भिती; सर्वांसमोर म्हणाला मला विधानपरीषदेवर घ्या
Vaishali Thakkar : वैशाली ठक्करने आत्महत्या का केली? सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
Sharad Pawar : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणणाऱ्या पवारांना भाजपने दिलं उत्तर; म्हणाले उद्धवजींची लाज…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now