Share

Har Har Shambhu: हर हर शंभू फेम गायिका स्विकारणार हिंदू धर्म, येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाली…

हर हर शंभू (Har Har Shambhu): ‘हर हर शंभू’ गाण्यासाठी कट्टरपंथीयांकडून चर्चेत आलेली लोक गायिका फरमानी नाजला मारून टाकण्याच्या धमक्या येत आहेत. ट्विटरवर ही माहिती देत तिने​​ सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे. इतकेच नाही तर फरमानीने मुस्लिम असूनही शिवभजने गायले त्यामुळे मला अश्या धमक्या येत असल्याचे कारण उघड केले असून लवकरच ती हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.(Farmani Naaz, Fundamentalist, Har Har Shambhu, Hinduism, Singer)

फरमानी हिने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे, “हर हर शंभू भजन गाण्याचा फतवा जारी करण्यात आला आहे. जिहादींकडून मारून टाकण्याच्या धमक्या येत आहेत. सरकार मला सुरक्षा द्या.” तिच्या पुढच्या ट्विटमध्ये ती लिहिते, “माझे पूर्वज आधी हिंदू होते. म्हणूनच मी ‘हर हर शंभू भजन’ गायले आहे. मी लवकरच हिंदू धर्मात सामील होणार आहे.”

फरमानी नाजने २४ जुलै रोजी तिच्या यूट्यूब चॅनेलवरून ‘हर हर शंभू’ हे भजन अपलोड केले आहे, ज्याला आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिचे भजन व्हायरल झाल्यावर देवबंदच्या अनेक मौलानानी त्यावर आक्षेप घेत या भजनाला इस्लामविरोधी म्हटले. त्याचवेळी हिंदू धर्माचे अनुयायी फरमानीच्या स्तोत्रांची स्तुती करत आहेत आणि तिला सन्मानित करण्याबाबत बोलत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, फरमानी नाजच्या मुलाला घशात काही आजार होता. यामुळे सासरच्या लोकांनी तिचा छळ तर केलाच, पण तिच्यावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून फरमाणी तिच्या माहेरी आली आणि तिच्या मुलासोबत तिथे राहू लागली.

रिपोर्ट्समध्ये फरमानीची आई फातिमा हिच्या म्हणण्यानुसार, काही लोक तिच्या गावात राहुल नावाच्या तरुणाचा व्हिडिओ बनवण्यासाठी यायचे. एके दिवशी फरमानीचा आवाज ऐकल्यावर तो त्याकडे इतका आकर्षित झाला की त्याने तिचे गाणे केवळ रेकॉर्डच केले नाही तर ते यूट्यूबवर पोस्टही केले.

लोकांना हे गाणे खूप आवडले आणि फरमानीला त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. फातिमा सांगते की फरमानीने आपल्या मुलाला वाढवण्यासाठी गायन हे कमाईचे साधन बनवले. फरमानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही या धर्माचे आहोत की त्या धर्माचे आहोत, असा विचार करून आम्ही गाणी कधीच गात नाही.

कलाकारांना कोणताही धर्म नसतो. जेव्हा आपण स्टुडिओमध्ये असतो तेव्हा आपण आपला धर्म विसरतो. आपला एकच धर्म असतो. धर्म असा होतो की आपण कलाकार आहेत. आम्ही भजन आणि कव्वाली देखील गातो आणि आमचे कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवतो.”

महत्वाच्या बातम्या
Anjali bhabhi Video: ‘तारक मेहता’मधील अंजली भाभीनेही दाखवला आपला हॉट अवतार, पाहून चाहते शॉक
शिंदे- फडणविसांच्या जोडीला मिळणार १२ मंत्री; ‘या’ तारखेच्या रात्री ६ वाजता होणार शपथविधी
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक दणका! मुंबई महापालिकेबाबत घेतला मोठा निर्णय

क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now