‘जात महत्वाची नसून अन्यायाविरूध्द लढणे महत्वाचे’

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नेतेमंडळी, कलाकार, प्रतिष्ठित व्यक्ती सोशल मिडियावर शिवजयंतीच्या शुभेच्छा देत असतात. मराठमोळी अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने शिवरायांना वंदन करत सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगूरूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साडी नेसून अतिशय सुंदर फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत रिंकूने म्हटले आहे की, छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरूध्द लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. ‘राजा माझा सुखकर्ता’. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. असं कॅप्शन दिलं आहे.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदेडमधील कार्यक्रमात आर्चीची झलक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. कोरोनाची महामारी अजूनही गेली नाही तरीसुध्दा आर्चीला पाहण्यासाठी तिच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यामुळे आयोजकांना चाहत्यांना आवरण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.

‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या आर्चीचे खुप चाहते आहेत. परशा आणि आर्चीच्या जोडीने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंदीस उतरलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायल्याने पुण्यात शाहीराला अटक
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल…
‘ही’ आहेत शिवरायांची प्रसिद्ध मंदिरे, एक तर खुद्द राजाराम महाराजांनी बांधलेय; पहा फोटो
सरकारने रायगडावर केलेल्या ’त्या’ गोष्टीवरून संभाजीराजे भडकले; म्हणाले हा तर काळा दिवस..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.