नवरदेव जसा कबुल है बोलला, तशी नवरी लागली नाचायला अन् अख्ख्या कुटुंबासमोर केलं नवऱ्याला किस

सोशल मीडियार रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात.

आता असाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांना हसू आवरत नाहीये. या व्हिडिओमध्ये लग्नात जसा नवरा कबुल है बोलतो, तेव्हा नवरी कुठलाही विचार न करता त्याला किस करते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो, पण काही लोक आपल्या लग्नाबाबत जरा जास्तच उत्साहित असतात. त्यामुळे त्या उत्सुकतेत कोण काय करेल हे सांगता येत नाही. अशीच एक नवरी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये असलेली नवरी तिच्या लग्नाबाबत खुपच उत्सुक आहे. लग्न लाऊन देणारे मौलवी जेव्हा नवरदेवाला कबुल है असं विचारतो, त्यानंतर नवरदेव हो बोलताच नवरीचा आनंद गगनात मावत नाही आणि ती पटकन नवरदेवाला किस करते.

ही नवरी हे विसरुनच जाते की ती लग्नामध्ये सर्वांसमोर बसलेली आहे. इतकंच नाही, तर तिचे कुटुंबातले लोकं पण तिच्या मागे बसलेले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला १४ हजारपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओ मजेदार कमेंट केल्या आहे. तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सर्वात आनंदी बायको असे लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”
परिस्थितीला हरवत ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर बनला; पण कोरोनाची लढाई हरला
व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.