तुझ्यासारखे लोक देशात आहेत याची लाज वाटते; टीम इंडियाचा क्रिकेटपटू चाहत्यावर भडकला

मुंबई | देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशात भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज हनुमा विहारी या कठीण काळात कोरोना रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे.

सध्या हनुमा विहारी इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. तो देशात नसला तरी कोरोनाच्या परिस्थितीत लोकांचे होणारे हाल आणि त्यांच्या अडचणींबद्दल तो संवेदनशील आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू लोकांना सतत मदत करत आहे. यासाठी त्याने आपल्या १०० मित्रांची एक टीम तयार केली आहे.क्रिकेटर विहारीने तयार केलेल्या या टीमच्या माध्यमातून ते कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करुन देत आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर देण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी व रुग्णांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी पुर्ण टीम झटत आहे.

दरम्यान, विहारीने इंस्टाग्रामवर एका मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याने ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. विहारीच्या या पोस्टवर एका चाहत्याने विहारीलाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्या चाहत्याने लिहिले, “तु स्वत: का मदत करत नाहीस. शेवटी तु एक प्रसिद्ध खेळाडू आहेस”.

चाहत्याने दिलेल्या या प्रतिक्रियेवर क्रिकेटपटू विहारीने त्याला सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, “भारत या परिस्थितीत आहे, कारण तुमच्यासारखी माणसे या देशात आहेत. ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे.”

विहारीने नुकतेच पीटीआयशी बोलताना सांगितले आहे की, ‘मला तळागाळातील लोकांची मदत करायची आहे. ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशा लोकांना मी मदत करू इच्छित आहे. कोरोनाची दुसरी लाट इतकी गंभीर आहे की, रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन मिळणे कठीण होत आहे. या काळात लोकांना मदत करण्याचे मी ठरविले आहे. अशा आहे की लवकरच सर्व काही ठिक होईल’.

महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकींग! कॉंग्रेसचे मोठे नेते राजीव सातव यांचे पुण्यात निधन
५० रूपये महिन्याला पगार असणारा व्यक्ती कसा बनला टाटा स्टीलचा चेअरमन, वाचा यशोगाथा
सुशांतने जीव ओवाळून टाकला ती माजी प्रेयसी करणार लग्न; म्हणते लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.