Homeराजकारण‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा'; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी

‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा’; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. पंतप्रधान ज्या रस्त्यावरुन जात होते त्याच रस्त्यावर आंदोलक शेतकरी जमा झाले होते. त्यामुळे मोदी यांना जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रस्त्यावरच थांबावे लागले. पुढे तर मोदी यांना आपला पंजाब दौराच रद्द करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते अवधूत वाघ यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला परतावे लागले. बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटे एका उड्डाणपुलावर अडकून पडले होते. काही आंदोलकांनी रस्त्याने जात असताना पंतप्रधान मोदी यांचा रस्ता अडवला होता. याबद्दल काही भाजप नेत्यांनी पंजाब सरकारवर निषेध नोंदवला आहे.

यावर, भाजप नेते अवधूत वाघ यांनी ट्विट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी “पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकावा” अशी मागणी करणारे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटू नाही यासाठी त्यांनी ट्विट डिलीटदेखील केले. मात्र वाघ यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याआधी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनीही मोदींच्या सुरक्षेच्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पाकिस्तानच्या सीमारेषेपासून केवळ १० किमी अंतरावरील मार्गावर आपण पंतप्रधानांसाठी सुरक्षित मार्ग देऊ शकत नाहीत. मग, आपणास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अरमिंदरसिंग यांनी म्हंटले होते.

यावर पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर परतावे लागले याचे मला वाईट वाटते. पण सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणण्यासाठी मला भटिंडा येथे जायचे होते, पण माझ्यासोबत आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे मी पंतप्रधानांना आणायला गेलो नाही. मी काही लोकांच्या संपर्कात होतो. जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे मला काळजी घेणे गरजेचे होते.

पंतप्रधान भटिंडाहून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दोन वर्षानंतर आज पंजाबमध्ये पोहोचले होते. वादग्रस्त कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पंजाब राज्याचा दौरा होता. या कायद्यांबाबत पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जवळपास वर्षभर आंदोलने केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणा सहण करणार नाही, काॅंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी माफी मागावी
अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया जितेंद्र आव्हाडांचे ओबीसी नेत्यांना आवाहन
“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”