“राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबद्दल श्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य” – चंद्रकांत पाटील

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असे ते म्हणाले असते.

‘पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे,’ असेही पाटील म्हणाले

दरम्यान, ‘महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे. विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असेही चंद्रकात पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असे सूचक विधानही पाटील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘हातावर पोट असलेल्या एक कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा’

दारूच्या नशेत असताना मध्यरात्री अजय देवगणला मारहाण? हा व्हिडीओ खरा की खोटा

देशमुख फॅमिलीचा होळीचा हा भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिला का? पाहून तुम्हीही म्हणाल, मस्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.