प्रेरणादायी! अवघ्या ४ वर्षांची चिमुकली एक पाय नसताना चढली उंच ढीगारा, पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील अनेक व्हिडीओ आपल्याला दैनंदिन जीवनासाठी प्रेरणा देतात. असाच एका चिमुकलीचा प्रेरणा देणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील चिमुकलीची जिद्द पाहून तुम्हीही तिला सलाम कराल.

माणसाला जीवनात खूप मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु हा संघर्ष वयाची १५ वर्षे पुर्ण केल्या नंतर खऱ्या अर्थाने सुरु होतो. मात्र काहींच्या नशीबी जन्मताच संघर्ष येतो. कारण काही मुले जन्मताच अपंग असतात. म्हणून ती जगण्याची उमेद सोडत नाहीत. तर दुप्पट मेहनत घेतात. याच उत्तम उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

व्हिडीओमधील चिमुकलीला एक पाय नाही. असे असले तरी तिला एका मातीच्या ढीगाऱ्यावर चढायचे आहे. लहान मुलांचे खेळतानाचे व्हिडीओ पाहून आनंद होतो. मात्र इथे या मुलीला खेळताना पाहून मात्र दुख: होत आहे. निरागस आणि गोंडस मुलीचा संघर्ष पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.

एका पायाला रॉड लावलेली चिमुकली एका उंच ढिगाऱ्यावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यासाठी तिला खुप मेहनत घ्यावी लागत आहे. ती एका पायाच्या मदतीने आधार घेत वरती सरकताना दिसते.

एकच पाय आणि चिमुकले हात यामुळे तिला ढीगाऱ्यावर चढण्यासाठी खुप त्रास होत आहे. परंतु ती हार स्विकार करत नाही. किंवा कोणाला मदतीसाठी बोलवत नाही, स्वत: प्रयत्न करते. अखेर ती तिच्या यशाच्या शिखरावर पोहोचते.

या चिमुकलीच्या धैर्य, जिद्द, चिकाटीचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. तिने केलेला संघर्ष पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आयुष्यात संघर्ष आणि अपयशाला कधी घाबराचे नसते हे व्हिडीओतून स्पष्ट होते.

महत्वाच्या बातम्या-
DDLJ मधील छुटकी इतकी बदलली, फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, आता करते ‘हे’ काम
अमेरिकेच्या नौसेनेच्या जहाजांमागे लागले होते युएफओ? समोर आला एक विचित्र व्हिडिओ
“आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी करोडो लोकांना बरं केलयं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.