अरे बापरे! कोरोनामुळे नवरदेवाला चक्क कलर देण्याच्या रोलरनीच लावली हळद; पाहा व्हिडिओ

कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

कोरोनामुळे विवाह सोहळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क यांचे पालन करून कमी वेळेत, कमी लोकांमध्ये  पार पाडले जात आहेत. काही ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे. मात्र काही ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.

काही दिवसांपुर्वी पीपीई किट घालून नवरानवरीने लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तर एका नव्याजोडप्याने काठीला हार बांधून एकमेकांच्या गळ्यात घातले होते. आता असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

लग्नाआधी नवरानवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम असतो. यामध्ये नवरानवरीला  हळद लावून हळद खेळली जाते. यानंतर पाहूणेमंडळी एकमेकांना हळद लावतात. मात्र कोरोनामुळे असं चित्र क्वचितच बघायला मिळतय.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका नवरदेवाला हाताने नाही तर चक्क घराला कलर देण्याच्या ब्रशने (रोलर) हळद लावली जात आहे. एका लांब काठीला रोलर बांधण्यात आला आहे. ही काठी हातात घेऊन भांड्यात ठेवलेल्या हळदीमध्ये बुडवून नवरदेवाच्या अंगाला हळद लावली जात आहे.

एका ट्विटर युजर्सने ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओला कोरोना काळातील हळदीचा कार्यक्रम. भारतीयांकडे सर्व गोष्टींचा उपाय आहे. असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कोरोनामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच एकमेकांच्यात संसर्ग होऊ नये म्हणून या परिवाराने काळजी घेतली आहे. यांच्या या भन्नाट युक्तीचे कौतूकच केले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-
८ महिन्याची गरोदर महिला उचलतेय तब्बल १५० किलो वजन अन् करतेय हेवी वर्कआऊट; पहा व्हिडिओ
VIDE0: कोरोना रुग्ण एका झटक्यात बरा होणार! औषधासाठी तोबा गर्दी, ICMR करणार चाचणी
जेवढे सोनं जमा झाले आहे, त्यातून दवाखाना, मेडिकल कॉलेज उभारणार, ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.