हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना अटक होण्याची शक्यता..

आपण सेलिब्रिटी असून आपल्याला फॉलो करणारा वर्ग हा लाखो करोडोंच्या संख्येत असतो याच भान कधी कधी हे सेलिब्रिटी विसरतात आणि नकळत एखादी चुकी झाली की त्याचे पडसाद मात्र तीव्र उमटतात, याची कल्पना आता काही सेलिब्रिटींना येणार आहे.

२०१९ साली हैद्राबादमध्ये एक बलात्काराची घटना घडली होती त्यामुळे संपुर्ण हैद्राबादला धक्का बसला होता. २०१९ मधे एका युवतीवर चार नराधमांनी बलात्कार केला होता आणि बलात्कार करून पीडितेला जिवंत जाळण्यात आले होते, सदर घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. आणि विविध स्तरातून या संतापजनक गोष्टीचा निषेध होत होता.

असाच निषेध व्यक्त करताना आणि पीडितेबद्दल दुःख व्यक्त करताना काही सेलिब्रेटींनी पीडितेची ओळख उघड केली होती. बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, रकुलप्रीत सिंह यांसोबत तब्बल ३८ सेलिब्रेटींनी पिडितेची ओळख उघड केली होती. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सेलिब्रिटींमध्ये साऊथचे काही दिग्गज कलाकार देखील आहेत. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांच्या तक्रारीची दखल घेत सब्जी मंडी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी भारतीय दंड संहिताच्या कलम २२८A नुसार गुन्हा दाखल केला आहे .

तक्रारदार वकिलांचे म्हणणे आहे की, कायद्याला धाब्यावर बसवत या सर्व सेलिब्रेटींनी पिडीतेची ओळख उघड केल्याने त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. या सर्व घडामोडींमुळे सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, रकुलप्रित सिंह सोबत इतर सेलिब्रिटींना आता अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हे प्रकरण दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात चालू असून न्यायालय यावर काय निर्णय देतय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

महत्वाच्या बातम्या
सध्या समजुतदार मुस्लिम नेत्यांनी धर्मांध शक्तींविरोधात एकत्र येण्याची गरज- मोहन भागवत
फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण
‘तारक मेहता’ मालिकेला पूर्णविराम? शुटींग थांबल्याने चाहते झाले अस्वस्थ; काय आहे शुटींग थांबण्यामागचे कारण?

मच्छीमाराला सापडला निळ्या रंगाचा दुर्मिळ झिंगा, किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.