सुशांतच्या बायोपिकमध्ये झळकणार ‘हा’ टिकटॉक स्टार!

मुंबई | सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक सर्वोत्कृष्ट कलाकार आपण सर्वांनीच गमवला आहे.

दरम्यान सुशांतच्या जीवनावर आधरित एक चित्रपट काढणार असल्याचे चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सांगितले आहे. मात्र सुशांतच्या बायोपिकचे नाव काय असेल?, या चित्रपटात सुशांतची भूमिका कोण करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बायोपिकमध्ये कोणी मोठा स्टार नाही, तर उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी असल्याची माहिती समजली आहे.

‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार आहेत. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, हे समोर आलेले नाही.

मी हा चित्रपट यासाठी करत आहे, जेणेकरुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे स्टार्स आणि प्रोडक्शन हाउसची अधिकारशाही संपली पाहिजे. असे निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून, सप्टेंबरपासून शुटिंग सुरु केले जाऊ शकते. मुंबई आणि पंजाबमधील काही ठिकाणी या चित्रपटाचे शुटिंग केले जाऊ शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.