जिम गरजेची आहे, मॉल सुरू करण्याचाही विचार आहे, पण लोकलबाबत…- राजेश टोपे

 

मुंबई | राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र आता राज्य सरकारने राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ची सुरुवात केली आहे.

मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. त्यावेळी त्यांनी आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरू केल्या जातील, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरू करावेत, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन बाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणांहून अनेक लोक मुंबईत कामाला येतात, त्यामुळे लोकल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी अनेकजण करत आहे. लोकांची मागणी रास्त आहे.

मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग या विषयांवरही राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणाऱ्या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. आत या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन सेंटरमध्ये लवकरच गाईडलाईन्स आखण्यात येतील, असेही यावेळी राजेश टोपे म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.