ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Gyanvapi Masjid case Hindu party lawyers serious allegations against varanasi collector)
यादरम्यान हिंदू पक्षाच्या वकिलांनी आणखी एक दावा केला आहे. ज्ञानवापी मशीदीमधील मोकळा झालेला वाळूखाना पुन्हा भरण्यात आल्याचे हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी सांगितले आहे. वाजूसाठी हा तलाव बनवण्यात आल्याचे सांगितले जात होते. पण आता हा तलाव पुन्हा पाण्याने भरल्याची माहिती हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी दिली आहे.
प्रशांत उमराव यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “न्यायालयाच्या आदेशानंतरही वाराणसीच्या डीएमने वाजूसाठी बनवण्यात आलेल्या तलावात पुन्हा पाणी भरले आहे आणि उपासकांचे घाण पाणी विश्वेश्वर शिवलिंगावर जात आहे. हे अस्वीकार्य आहे”, असं ट्विट हिंदू पक्षाचे वकील प्रशांत उमराव यांनी केलं आहे.
https://twitter.com/ippatel/status/1526110419374309377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526110419374309377%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fnews%2Fgyanvapi-mosque-survey-varanasi-dm-refutes-the-rumor-related-to-wazu-pond%2F
पण वाराणसीचे डीएम कौशल राज यांनी हा दावा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. वाराणसीचे डीएम कौशल राज यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की, ““कृपया खोटी माहिती पसरवू नका आणि न्यायालयाचे काम तुम्ही करू नका. देशातील सुव्यवस्था कायम राखण्यासाठी न्यायालये आहेत. न्यायालयाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. तलावातील पाणी कधीच पूर्णपणे काढले गेले नाही. फक्त पाण्याची पातळी कमी केली आहे.”
https://twitter.com/ippatel/status/1526110419374309377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526122838750482432%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fnews%2Fgyanvapi-mosque-survey-varanasi-dm-refutes-the-rumor-related-to-wazu-pond%2F
१६ मे रोजी सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी ज्ञानवापी मशिदीमध्ये तलावाच्या रूपात एका विहिरीत शिवलिंग सापडले असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. मशिदीच्या वरच्या भागात ज्या ठिकाणी नमाज अदा केली जाते. त्या ठिकाणी वाजूसाठी एक छोटा तलाव बांधण्यात आला आहे. या तलावात शिवलिंग सापडले असल्याची माहिती मिळत आहे.
हिंदू पक्षाच्या दाव्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे बाबरी मशिदी डिसेंबर १९४९ ची पुनरावृत्ती आहे. हा आदेश स्वतःच मशिदीचे धार्मिक स्वरूप बदलतो. हे १९९१ च्या कायद्याचे उल्लंघन आहे”, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते. या प्रकरणावर राजकीय पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूनी मिडीया आणि चाहत्यांच्या दबावाखाली घेतला होता निवृत्तीचा निर्णय
मला जी भिती होती ती खरी ठरली; ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्यानंतर ओवेसींनी दिली धक्कादायक प्रतिक्रिया
सालारच्या दिग्दर्शकाचं टेन्शन वाढलं; प्रभासच्या चाहत्याने आत्महत्येची धमकी देत केली ‘ही’ विचित्र मागणी