Guru Jaggi Vasudev : सध्या देशात दिवाळी आनंदात साजरी केली जात आहे. दिवाळी हा एक वर्षातील एक मोठा सण असतो यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. असे असताना दिवाळीत फटाके फोडण्याकरून दरवर्षी अनेक नियम व अटी लागू केल्या जातात. यावरून नेहेमीच वाद उभा राहतो. सध्या देखील असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.(Guru Jaggi Vasudev, Firecrackers, Pollution,)
देशातील अनेक राज्यांत फटाके फोडण्यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. अशातच गुरु जग्गी वासुदेव यांनी आता लहान मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नका असे आवाहन केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या मागणीवर काय निर्णय होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
गुरु जग्गी वासुदेव म्हणाले, की बाळांनो फटाके फोडा, प्रदूषणाचा त्रास होणाऱ्यांनी ऑफिसला पायी जावं मुलांचा आनंद हिरावून घेऊ नका, लोकांना वायू प्रदूषणाची चिंता आहे त्यांनी रोज आपल्या कामाच्या ठिकाणी चालत जावे, मुलांना मजा करता यावी म्हणून पुढील तीन दिवस गाडी चालवू नये.
मुलांना फटाके फोडण्याची मजा घेऊ द्या, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान देशातील अनेक राज्यांत फटाके फोडण्यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. तर यावरून काही ठिकाणी हिंदू सणांच्या वेळीच असे निर्बंध लावले जातात असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
यामुळे याला धार्मिक रंग दिला जात आहे, त्यातच गुरु जग्गी वासुदेव यांनी आता लहान मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नका असे आवाहन केले आहे. मी बर्याच वर्षात फटाका पेटवला नाही पण लहानपणी मला त्याचा किती आनंद मिळत होता ते आठवते, असेही ते म्हणाले.
अनेकांनी फटाके खरेदीवर बंदी करण्यापेक्षा फटाके निर्मिती करणाऱ्या कंपन्या बंद करा असे म्हटले आहे. कंपन्यांच बंद केल्या तर सगळा प्रश्न मिटेल, असेही अनेकांनी म्हटले आहे. कोरोनामुळे देखील अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Madhyaprdesh : हृदयद्रावक! दुचाकीच्या डिक्कीतून नवजात बाळाचा मृतदेह नेण्याची दुर्दैवी वेळ आली बापावर…
Eknath shinde : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीची मोठी घोषणा
Munawwar Rana: माझा बाप मुस्लिम होता याची मी गॅरंटी देतो पण माझी आई.., शायर मुनव्वर राणांचे पुन्हा विचित्र वक्तव्य