ना रेमडीसीवीर, ना व्हेंटीलेटर तरीही २९ हजार रूग्णांना बरे करणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा दाखल

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात अनेक डॉक्टरांनी रेमडेसिवीरविना कोरोना रुग्ण बरे करण्याचा दावा केला आहे.

आता असाच एक दावा कल्याणचे डॉक्टर यु एस गुप्ता यांनी केला आहे. त्यांच्याकडे असलेले दोन ड्रॉप घेतल्याने कोरोना रुग्ण झटपट बरा होत असल्याचा दावा गुप्ता डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी आतापर्यंत २९ हजार ७८ कोरोना रुग्णांना बरे केल्याचा त्यांनी म्हटले आहे

कल्याणच्या वांगणीभागात गुप्ता डॉक्टरांचा छोटासा दवाखाना आहे. त्याच ठिकाणी ते कोरोना रुग्णांवर उपचार करतात. अनेक कोरोना रुग्णांना त्यांनी बरे केले असल्यामुळे तिथे कोरोना रुग्णांची उपचारासाठी झुंबड उडालेली असते.

विशेष म्हणजे या छोटाश्या दवाखान्यात ना आयसीयु, ना व्हेंटिलेटर, ना रेमडेसिवीर तरी इथे आलेला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊन जात असल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी ते फक्त दोन ड्रॉप देतात अन् रुग्ण झटक्यात बरा होतो, असे डॉ. गुप्ता यांनी म्हटले आहे.

डॉ. गुप्ता हे हॉमियोपॅथीचे डॉक्टर आहे. त्यांच्याकडे पोटँटाईज नावाचे औषध आहे. त्याच्या माध्यातून ते कोरोना रुग्णांना बरे करतात असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक रुग्णावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करुन त्यांना बरे केले जाते, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकीकडे कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर धडपड करत आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे वांगणीतील हे डॉक्टर फक्त दोन ड्रॉपमध्ये कोरोना रुग्णांना ठणठणीत करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तसेच अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे.

तसेच आता कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार केल्याने या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय उपचार करताना मास्क लावत नसल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन बदलापूर ग्रामीण पोलिसातही या डॉक्टरांवर गुन्हा करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आज आमच्या दारात देव आला; आमदार निलेश लंके यांचा करमाळावासियांनी पाय धुवून केला सत्कार
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची बिकट स्थिती, यमुनेत तरंगताहेत मृतदेह; यंत्रणाही हादरली
मुंबई कशी बदलली? तेव्हाच्या आणि आताच्या मुंबईत काय फरक आहे? पहा शरद पवार काय म्हणतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.