एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी वकील गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.(gunratn sadavrte establish new party)
यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जय श्रीराम अशा घोषणा देखील दिल्या. गेल्या काही दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते राजकारणात प्रवेश करणार आहेत, अशा बातम्या समोर येत होत्या. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नवीन पक्षाची स्थापना करून यावर शिक्कामोर्तब केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते एसटी महामंडळ बँकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
या निवडणुकीसाठी वकील गुणरत्न सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाला किती यश मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता.
यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणी ११० एसटी कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावली होती.
एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी चिथावल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २६ एप्रिलला वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला.
त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांची कोठडीतुन सुटका झाली आहे. कोठडीतुन सुटका झाल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले होते. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
… अन् बूट काढून सलमानने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन, व्हिडिओ व्हायरल
“राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं”, नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नवनीत राणांचे तुरुंगातील रात्रीचे व्हिडिओ जारी करावे; भाजप नेत्याची मुंबई पोलिसांकडे मागणी