धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप

 

मध्य प्रदेशच्या भोपळमध्ये असलेल्या प्रसिद्ध धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या संस्थांमध्ये शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींनी शास्त्रीय संगीतकार गुंदेचा बंधूंवर लैंगिक छळाचे आरोप केले आहे.

त्यामध्ये एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, गायक रमाकांत गुंदेचा यांनी माझ्यावर बलात्कार केला होता, तर त्यांचे दोन भाऊ उमाकांत आणि अखिलेश यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहे, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे.

तसेच पाच विद्यार्थिनींनी धृपद संस्थामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ज्या पण विद्यार्थिनीने रमाकांत यांना नकार दिला, त्यांना ते शिकवण्यासाठी टाळाटाळ करत असे, तसेच त्या विद्यार्थिनीचा वर्गात अपमान केला जायचा असेही काही विद्यार्थिनींनी म्हटले आहे.

धृपद संस्थानात फक्त देशातीलच नाही तर परदेशात विद्यार्थी विद्यार्थिनी संगीत शिकण्यासाठी येतात, २०१९ मध्ये रमाकांत यांचे निधन झाले होते. तर उमाकांत गुंदेचा हे शास्त्रीय गायक आलेत, तर अखिलेश हे पखवाजवादक आहे.

भारतीय कायद्यानुसार लैंगिक छळ किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक संस्थेला एक समिती स्थापन करून देण्यात आली आहे, त्या समितीकडे विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली असून गेल्या चार महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, लैंगिक छळाचे सर्व आरोप अखिलेश आणि उमकांत गुंदेचा यांनी वकिलांमार्फत फेटाळून लावले आहे. गुंदेचा बंधू आणि धृपद संस्थानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने हे आरोप केले आहेत, असा दावा गुंदेचा बंधूंमार्फत करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.