मराठ्यांमध्ये फार अँड फ्लंग नाही, ५२ मोर्च्यांमध्ये उंची पेहरावे, बीएमडब्ल्यू गाड्या होत्या – सदावर्ते

मुंबई | संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिम कोर्टाने आज निकाल जाहीर केला आहे. यावेळी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वाोच्च न्यायलयाच्या निर्णयाचं अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केले आहे. “महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. जे भीतीपोटी समोर येऊन बोलू शकत नव्हते. त्यांनी मला व माझ्या कुटूंबीयांना पाठींबा दर्शवला होता. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”. असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजामध्ये फार अँड फ्लंग नाही. ५२ मोर्चे, चार पाच हजाराचे पेहराव घातलेले, BMW तून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांनी दिल्लीत बसून घेतलेल्या बैठका, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे. याविरूध्द खुल्या गुणवंतांनी संविधानामार्फत केलेली ही लढाई होती”.

“यापुढे आरक्षणाच्या चष्म्यातून गलिच्छ राजकारण राज्यात आणि देशात होऊ नये. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटील हिचा खून झाला तरी ही लढाई आम्ही सुरू ठेऊ. आमचा जीव घेण्याच्या मागे लागलेल्या लोकांना हे मी सांगू इच्छितो”. असं अॅड गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६% आरक्षण दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  यावर गेल्या अनेक महिन्यांपासून तारखावर तारखा देण्यात येत होत्या. अखेर  आज यावर निकाल देण्यात आला आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनीही राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आता मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मराठी सिनेसृष्टी हादरली; मुळशी पॅटर्नच्या हिरोवर कोरोनाचा घाला
“ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा ठरवून खून केला”
सुप्रिम कोर्ट म्हणाले मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस आहे- ऍड. गुणरत्न सदावर्ते

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.