गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता विचित्र आवाज; पेटी उघडताच सर्वांना बसला धक्का

देव तारी त्याला कोण मारी हे आपण अनेकदा ऐकून असले असून अशा अनेक घटना आपण बघितल्या पण असेल. आता अशीच उत्तर प्रदेशच्या गाझीपुरमध्ये घडली आहे. गंगात वाहणाऱ्या एका पेटीमध्ये नावाड्याला एक तीन आठवड्यांची मुलगी भेटली आहे.

गाझीपुरच्या गंगा नंदीजवळील एक नावाडी त्याची बोट नेत असताना त्याला गंगेमध्ये एक पेटी तरंगताना दिसली. जवळ जाऊन बघितले तर त्यामधून रडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर त्या नावाड्याने पेटी उघडताच त्याला त्या पेटीमध्ये तीन आठवड्यांची लहान मुलगी भेटली आहे.

तसेच या पेटीमध्ये त्या नावाड्याला दुर्गादेवीचा फोटोसोबत अनेक देवीदेवतांचे फोटो सापडले आहे. या पेटीमध्ये नावाड्याला त्या पेटीतल्या मुलीची जन्मपत्रिकाही सापडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.

नावाड्याचे नाव गुल्लु चौधरी असे आहे. मंगळवारी संध्याकाळी गुल्लुनदीत नाव चालवत होता. तेव्हा त्याला एका लाकडीपेटी गंगेत तरंगताना दिसली. त्या पेटीतून रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे हे पाहून त्या ठिकाणी घाटावरचे काही लोक पण जमले.

त्यानंतर जेव्हा त्यांनी तो बॉक्स उघडून पाहिला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या पेटीमध्ये एक नवजात मुलगी होती. मुलीला ओढणीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. मुलीला बघताच तिथल्या लोकांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच आता पोलिसांनी त्या मुलीला ज्योती केंद्रामध्ये सुरक्षितरित्या पोहचवले आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी जिल्हा दंडाधिकारी गाझीपुर यांना आदेश दिले की नवजात मुलीला चिल्ड्रेन होममध्ये ठेवण्यात यावे, असे आदेश दिले आहे.

तसेच या मुलीच्या पालन पोषणाचा खर्च सरकारी खर्चातून करण्यात यावा. तसेच त्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या नावाड्यालाही शासकीय निवासस्थानासह सर्व सुविधा देण्यात याव्या असेही मुख्यमंत्री योगी आदीत्यानाथ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चिंटूकल्या पक्षांनी आणली मांजरीच्या नाकी नऊ, पहा मजेशीर व्हिडिओ
अखेर इंदापुरची हलगी रंगडांग रंगडांग वाजली! राधा खुडे ठरली सुर नवा ध्यास नवाची तिसरी विजेती
VIDEO’; काय सांगता! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.