‘सोमय्या, आपली औकात पाहून बोला; ठाकरेंच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झालात’

मुंबई | अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केली आहे.

यावरून आता चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरोपांना उत्तर द्यावं; असं आव्हान किरीट सोमय्यांनी शिवसेनेला दिले आहे. यावरून आता सेनेकडून देखील भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होतं आहे.

याचबरोबर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. ‘सोमय्यांचं वक्तव्य बेताल असून त्यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम झालाय. सोमय्यांना ठाण्याला दाखवले पाहिजे, तिथं त्यांच्या डोक्याला शॉक दिल्यानंतरच त्यांचं हे वक्तव्य बंद होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘ज्या ठाकरेंच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झालात, त्या ठाकरे कुटुंबीयांवर तुम्ही आरोप करतात. मला तरी वाटतं, हे एहसान फरामोश माणूस आहे. या अहसान फरामोश माणसाने उद्धव ठाकरेंवर टीका करु नये, अगोदर आपली औकात पहावी, असे टीकास्त्र पाटील यांनी सोमय्यांवर सोडले आहे.

तसेच शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी सोमय्या यांना खुले आव्हान दिले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात ३० व्यवहार झाले असतील तर सोमय्यांनी सिद्ध करावे,’ असे आव्हान वायकर यांनी सोमय्या यांना दिले आहे. याचबरोबर सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे ते म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेत केलं शिवशाहीरांच कौतूक
भाषा सांभाळून वापर नाहीतर उलटे फटके देऊ; अनिल परब यांना धमकी
अन्वय नाईक – ठाकरे कुटुंबात व्यवहार झाले असतील तर…; सेनेच्या वाघाने दिले खुले आव्हान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.